देश विदेश

खुशखबर ! यंदाही मान्सून चांगला बरसणार

नवी दिल्ली — भारतात गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिण्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरला तर शेतकर्‍यांच्या आनंदाबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील याचा फायदा होणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने यावर्षी सर्वसामान्य पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ऑस्ट्रेलियाचं हवामान खातं हे त्याच्या अचूक अंदाजासाठी जास्त प्रसिद्ध आहे.
दरम्यान, भारतीय विभागाकडून अद्याप हवामान विभागाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. कदाचित एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय एक्यूवेकर या वेदर कंपनीने देखील भारतात यावर्षी दुष्काळ पडणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे.
भारतात अनेक ठिकाणी मे महिन्याच्या सुरुवातीला पेरणीला सुरुवात केली जाते. यावर्षी जर मान्सुन पूर्व काळात चांगला पाऊस पडला तर शेतकर्‍यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. याशिवाय शेतकर्‍यांना त्यांचं शेत तयार करण्यासाठीही चांगली मदत होईल. याशिवाय त्यांना पाण्यासाठी लागणारा खर्चही वाचेल.
योग्य वेळी पेरणी झाली तर चांगले पीकं उगवण्याची आणि त्यापासून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता वाढते. जर खरंच तसं झालं तर शेतकर्‍यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक भागात सध्या शेतकरी त्यांच्या शेतीला पेरणीसाठी तयार करत आहेत. दरम्यान, मान्सून यावर्षी धोका देणार नाही, अशी वैज्ञानिकांनादेखील आशा आहे.
पाऊस कमी-जास्त पडला तर त्याचा थेट परिणाम खेड्या गावात राहणार्‍या नागरिकांवर पडतो. त्यामुळे पाऊस चांगला किंवा सामान्य स्वरुपाचा पडला तर शेतकर्‍यांना दिलासा मिळतो. कारण पावसाळ्यात पीकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते.
पावसाच्या पाण्यातून ती गरज भरुन निघते. पीकांना चांगलं पाणी मिळाल्याने उत्पन्न देखील चांगलं येतं. त्यामुळे शेतकर्‍यांचा फायदा तर होतोच याशिवाय देशाची आर्थिक व्यवस्थाही सुधारते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close