आरोग्य व शिक्षण

बीड जिल्ह्यात कोरोना चे संक्रमण वाढलेलेच,375 रूग्ण सापडले

बीड — जिल्ह्यात सुरेश धस सारखे लोकप्रतिनिधी जनतेचे आरोग्य पणाला लावत लाॅक डॉऊन ला विरोध करत आहेत.तर दुसरीकडे जिल्ह्याची रुग्ण संख्या वाढत चालली आहे. शनिवारी रुग्ण संख्येचा आकडा 375 वर जाऊन बसला. बीडची रुग्णसंख्या 112, तर अंबाजोगाई ची संख्या 75 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात लॉक डाऊन च्या दुसऱ्या दिवशी 2713जणांच्या अहवालात 375 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अंबाजोगाई मध्ये 75,आष्टीत 30 बीड तालुक्यात 112 रुग्ण सापडले. धारूर तालुक्यामध्ये 12, गेवराई तालुक्यात 24, केज मध्ये 27, माजलगाव तालुक्यात 25 ,परळी 38, पाटोदा 23 तर शिरूर तालुक्यात फक्त चार वडवणी तालुक्यात पाच रुग्ण सापडले आहेत. बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे नऊ रुग्ण सापडले आहेत चौसाळा येथे चार रुग्ण सापडले असून पोलीस अधीक्षक कार्यालयातील एक कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close