क्राईम

मारहाण झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू; तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

माजलगाव — जुन्या भांडणाच्या रागातून एका युवकाला चाकू व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील नवीन बस स्टँड परिसरात 23 मार्च रोजी घडली होती.जखमी झालेल्या युवकावर उपचार सूरू असताना 26 मार्च रोजी मृत्यू झाला आहे.मृत व्यक्तीच्या भावाच्या फिर्यादीवरून तिन जनांविरोधात शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की 23 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता महेश सोळंके,मारुती सोळंके व अशोक सावंत या तिघांनी भागवत आगे या 25 वर्षीय युवकासोबत महेश सोळंकेशी झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढत शहरातील नवीन बस स्टँड येथे असलेल्या मुतारी जवळ भांडण सुरु केले. यावेळी भागवत आगे यास दगडाने चाकूने अवघड जाग्यावर व कपाळावर मारहाण करून गंभीर दुखापत केली होती.दरम्यान जखमी भागवत आगे यास माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतु त्याची बिघडलेली गंभीर परिस्थिती पाहता त्यास बीड येथील रुग्णालयात हलवण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला.बीड येथे तीन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते.आज शुक्रवार रोजी त्याची प्रकृती अवघड जागेला गंभीर दुखापत झाल्याने बिघडल्याने पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी त्याला अंबाजोगाईला हलविण्याचा सल्ला त्याच्या नातेवाईकांना दिला होता. दरम्यान जखमी भागवत आगे यास बीड वरून अंबाजोगाई कडे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या हल्लेखोर महेश अशोक सोळंके,मारुती अशोक सोळंके (राहणार फुले नगर) व अशोक सावंत रा. शिवाजीनगर या तिघांविरोधात मयत भागवत अशोक आगे याचा भाऊ विजय अशोक आगे यांने शुक्रवार दि. 26 रोजी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या तीन आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close