क्राईम

जानेगाव येथे दगडाने ठेचून महिलेचा खून

केज — येथून जवळच असलेल्या  जानेगाव येथे एका 35 वर्षीय महिलेचा घराच्या जवळच दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ माजली आहे.
जानेगाव येथील अनिल चटप यांचे कुटुंब गावच्या बाजूला शेतात वास्तव्यास आहे. दरम्यान गुरुवार दि 25 मार्च रोजी रात्री आठच्या दरम्यान आशा अनिल चटप ही महिला घरी एकटीच होती. तर तिचे पती अनिल चटप हे दूध घालण्यासाठी गावात गेले होते. परंतु ते जेंव्हा घरी आले तेंव्हा पत्नी घरात दिसून न आल्याने त्यांनी इकडे तिकडे शोध घेतला. यावेळी घरापासून जवळच आशाचा मृतदेह आढळून आला. शरीरावर दगडाने ठेचल्याच्या खुणा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असून नेमका प्रकार काय घडला हे स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत गून्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close