आपला जिल्हा

कोतवालाने तहसीलमध्ये सहकारी महिलेची काढली छेड ; विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

माजलगाव — येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या कोतवालाने कार्यालयातील आपल्या सहकारी महिला कर्मचाऱ्याची छेड काढल्याची घटना 9 मार्च रोजी घडली. दरम्यान पीडित महिलेने गुरुवारी 25 मार्च रोजी कोतवाला विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार पीडित महिला व खरात आडगाव येथील कोतवाल कुंडलिक लिंबाजी आढाव हे माजलगाव तहसील येथे कार्यरत आहेत.9 मार्च 2021 रोजी पीडित महिला आपल्या कार्यालयात कार्यालयीन कामकाज करत असताना कोतवाल कुंडलिक आढाव याने संबंधित महिलेस अश्लील भाषेत शेरेबाजी करत छेड काढली तसेच पाठीमागून महिलेस मिठी मारली.दरम्यान पीडित महिलेने प्रत्यक्ष हजर होत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुरुवार दि.25 मार्च रोजी आरोपी कुंडलिक लिंबाजी आढाव (कोतवाल)याच्याविरुद्ध भादवि कलम 354 अन्वये विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.प्रकरणाचा पुढील तपास पो.नि. धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड हे करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close