आपला जिल्हा

अखेर नको तेच झालं! बीड जिल्हा दहा दिवसांसाठी लाॅक डाऊन

बीड — जिल्ह्यात कडक निर्बंध घातले गेले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहिली. परिणामी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी वाढत्या रूग्ण संख्येला आळा घालण्यासाठी 26 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान संपूर्ण बीड जिल्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली

जिल्ह्यात दररोज दोनशे ते साडेतीनशे या दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.त्यामूळे जिल्हा आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने अखेर लॉक डाऊन करण्याचा निर्णय बुधवारी घेतला . त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत .

या बाबी राहणार कडेकोट बंद

बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक – खासगी क्रीडांगणे , मोकळ्या जागा , उद्याने , बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील तसेच सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे आदेश आहेत . उपहारगृह सर्व रेस्टॉरंट , लॉज , हॉटेल , मॉल , बाजार मार्केट बंद असतील . सर्व केशकर्तनालय , सलुन ब्युटी पार्लर , शाळा , महाविद्यालय , शैक्षणिक संस्था प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारच्या शिकवण्या पूर्णतः बंद राहणार आहेत . याबरोबरच सार्वजनिक व खासगी बस सेवा , ट्रक , टेम्पो , ट्रेलर , ट्रॅक्टर , इत्यादीसाठी संपूर्णतः बंदी घालण्यात आली आहे .

अत्यावश्यक सेवेसाठी अशी आहे व्यवस्था-

सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील . किरकोळ विक्रेत्यांना सकाळी सात ते नऊ या वेळेतच केवळ दुकानातून घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल . त्या दरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील . दूध विक्री व वितरण सकाळी दहा वाजेपर्यंत घरपोच अनुज्ञेय राहील . तथापि दूध संकलन नेहमीप्रमाणे विहित वेळेनुसार सुरू ठेवता येईल . त्या दरम्यान सामाजिक आंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील . याचबरोबर
भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी सात ते दहा या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना विक्री करता येईल . त्यादरम्यान फळ विक्रेत्यांना गल्लोगल्ली फिरून सकाळी 7 ते 12 या वेळेतच फळ व भाजीपाला विक्री करता येणार आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close