आपला जिल्हा

तत्वज्ञानाचा डोस आता मला पचना! काय सांगू राणी मला बंगला सुटेना ऽऽऽ

बीड — लोकांची अक्कल काढत तत्वज्ञानाचे डोस पाजणारे व स्वतःच्या अकलेची शेखी मिरवणाऱ्याबीडच्या माजी जिल्हाधिकार्‍यांची देखील शासकीय निवासस्थानाचा मोह आवरत नसल्यामुळे अक्कल गहाण पडली की काय असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे. राहुल रेखावार यांची बदली होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी अद्याप त्यांनी बीडचे सरकारी निवासस्थान सोडले नाही परिणामी नवे जिल्हाधिकारी जगताप यांच्या डोक्याला मात्र ‘ ताप ‘ निर्माण झाला आहे.

राजकारणातील मंडळींना सरकारी निवासस्थान सोडण्याचा मोह होत नाही अशा बातम्या नेहमीच वाचनात येतात मात्र हटवादी भूमिका घेणारे अधिकारी देखील सरकारी निवासस्थान सोडताना नियमांच्या आयचा.. घो म्हणत निवासस्थान सोडत नसल्याचं चित्र बीड जिल्ह्याला पाहावयास मिळत आहे. एरवी हेच मग्रूर अधिकारी लोकांना तत्वज्ञानाचे डोस पाजत सार्वजनिकरित्या अक्कल काढतात पण या लोकांची देखील परिस्थिती पुढे अक्कल गहाण कशी पडते याचं ज्वलंत उदाहरण सध्या जिल्हा अनुभवत आहे. शेवटची कारकीर्द वादग्रस्त बनवणाऱ्या बीडच्या माजी जिल्हाधिकाऱ्यांची हि कहाणी आहे
बीडचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची जानेवारीमध्ये बीड येथून बदली झाली. काही दिवसातच त्यांना उमेद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली. मात्र काहीच दिवसात त्यांना या पदावरून देखील हटवण्यात आले. 24 फेब्रुवारी रोजी त्यांची महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली. जानेवारीमध्ये बीडमधून त्यांची बदली झाली. या गोष्टीला आता तीन महिन्याचा कालावधी उलटत आहे. अशा स्थितीत त्यांनी तात्काळ जिल्हाधिकार्‍यांचे निवासस्थान सोडण्याची आवश्यकता होती पण ज्ञान सांगे लोका ला शेंबुड आपल्या नाकाला अशी स्थिती त्यांची निर्माण झाली. एरवी नैतिकतेच्या गप्पा मारणारे हे जिल्हाधिकारी म्हणून प्रत्यक्षात कसे आहेत नियम कायदे कसे पायदळी तुडवत आहेत याचा अनुभव बीडची जनता याची डोळा अनुभवत आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हटवादी भूमिकेमुळे जिल्हाधिकार्‍यांचे निवासस्थान रिकामे न झाल्यामुळे बीडचे नवे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना मात्र प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या बीड जिल्हा कोरोना महामारीच्या संकटाला सामोरा जात आहे अशा स्थितीत व्या जिल्हाधिकार्‍यांना मानसिक त्रासाला सामोरे जाणे बीडच्या दृष्टीने धोक्याचे आहे. अशा संकटाच्या निर्णय घेताना कुठलीही चूक होऊ नये यासाठी आरामाची आवश्यकता देखील निर्माण झाली आहे. परंतु याच्याशी राहुल रेखावार यांना काहीच देणे घेणे नाही. त्यांनी लवकरात लवकर िल्हाधिकार्‍यांचे निवासस्थान रिकामं करत थोडीतरी जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगावी असा आता जनतेतून बोललं जाऊ लागल आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close