आपला जिल्हा

जिल्हा रुग्णालयात अर्धे कोरोना रुग्ण पडद्यात तर अर्धे उघड्यावर

बीड —-  बीड येथील सरकारी दवाखान्यामध्ये कोरोना महामारी मुळे आजारी असलेल्या रुग्णांना भरती करण्यात आले आहे. एका रुग्णाचा सहवास दुसऱ्या रुग्णा बरोबर येऊ नये, याची सर्वत्र काळजी घेतली जात आहे. मात्र जिल्हा रुग्णालयातील अर्धे रुग्ण आपल्या केबिनला पडदा लावून आत असतात. तर अर्ध्या रुग्णांच्या केबिनला पडदाच नसल्याची बाब समोर आली आहे. हे कृत्य चुकीचे असून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली आहे.

कोरोणा पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना योग्य त्या सेवा देण्यासाठी करोडो रुपये खर्च होत आहेत. मात्र त्यांच्या सेवेमध्ये अनेक वेळेस कसूर असल्याचे लोक वारंवार सांगत आहेत. यातून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सुधारणा करणे आवश्यक असताना लोकांच्या या समस्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, हे आता स्पष्ट दिसत आहे.

जिल्हा रुग्णालयातील वॉर्डामध्ये स्वच्छता नसणे, जेवण बरोबर न देणे, स्वच्छतागृह स्वच्छ न ठेवता तेथे दुर्गंधी असणे, पेशंटला वेळेवर न तपासणे, कोरोना पेशंटचा दवाखाना परिसरात अथवा अन्यत्र वावर असणे, अशा अनेक बाबी यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत.

कोरोना पेशंट ज्या ठिकाणी दवाखान्यात ॲडमिट आहेत, या वॉर्डात काही रुग्णांच्या कॉट भोवती पडदा लावलेला आहे. केबिनची व्यवस्था सगळीकडे असली तरी उभारलेल्या पार्टिशनच्या समोरचा पडदा अनेक रुग्णांच्या बेडला लावलेला नाही. त्यामुळे संसर्ग वाढू शकेल का ? अशी भीती रुग्णांच्या मनात असते.

रुग्णाने सरकारी दवाखान्यांमध्ये निवांत रहावे. जे उपचार खाजगी दवाखान्यात लाखो रुपये खर्च करून केले जातात, तेच उपचार सरकारी दवाखाना दवाखान्यात केले जात आहेत. त्यामुळे पेशंट व त्यांचे नातेवाईक यांनी सरकारी दवाखान्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. इथे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.

सरकारी दवाखान्यातील हा प्रकार जन आंदोलनाने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. तर याच बरोबर जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडे याबाबत बैठक बोलावून त्या बैठकीला आम्हाला बोलवावे आणि दवाखान्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणीही अजित देशमुख यांनी केली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close