महाराष्ट्र

मालमत्तेचा लिलाव करा पण शेतकऱ्यांची थकबाकी द्या सहकार आयुक्तांचे वैद्यनाथ कारखान्याला आदेश

बीड — माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याला ऐन महाशिवरात्रीच्या दिवशीच राज्याच्या सहकार आयुक्तांनी मोठा दणका दिला आहे. कारखान्याने ऊस उत्पादक‌ शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे थकित बाकी वेळप्रसंगी मालमत्तेचा लिलाव करून द्यावी असे आदेश राज्य सहकार आयुक्तांनी दिले . त्यामुळे संचालक मंडळाच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. पगार थकविल्याने कालच कामगारांनी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आधी पगार द्या त्यानंतरच कामे सुरू करू असा अक्रमक पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतल्यानंतर आता वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला पुन्हा सरकारकडून आणखी एक धक्का बसला आहे. कारखान्याने उसउत्पादकांची एफआरपीची रक्कम थकविल्याने कारखान्याला नोटीस देण्यात आली होती. मात्र कारखान्याने सदर रक्कम न दिल्याने आता 25 कोटी 79 लाखाच्या थकबाकीसाठी राज्याचे सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांनी आरआरसीप्रमाणे वसुलीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता ही रक्कम महसुली वसुली म्हणून वसूल करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना प्राधिकृत करण्यात आले असून साखर, मोलॅसिस याची विक्री करून आणि गरज पडल्यास कारखान्याच्या इतर मालमत्तांचा लिलाव करून सदर वसुली करावी असे आदेश सहकार आयुक्तांनी दिले असल्याने साखर कारखान्याचे संचालक मंडळ आणखीनच नव्या संकटात सापडले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close