आपला जिल्हा

एमपीएससी परीक्षा रद्द केल्याच्या निषेधार्थ परीक्षार्थी आक्रमक

बीड —१४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा ३ दिवसावर आलेली असताना पुढे ढकलण्यात आली त्यामुळे परीक्षार्थी मध्ये सरकार विरोधात रोषाची भावना निर्माण झाली. शासन निर्णय विरोधात निषेध नोंदवत परीक्षार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत प्रचंड घोषणाबाजी केली.

 

इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणं हे चूक आहे. सरकारने तातडीने हा निर्णय बदलायला हवा. परीक्षेच्या ३ दिवस आधी परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत. असे आंदोलक विद्यार्थी आबासाहेब जगदाळे यांनी सांगितले.

सरकार आमचे नुकसान करतेय–

कोरोनाचे कारण पुढे करत सरकारने एमपीएससी परीक्षेच्या संदर्भात घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे. सातत्याने असे प्रकार होत असल्यामुळे महाराष्ट्रातील एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण होत आहे. अशा प्रकारे जर हे सरकार आमचे नुकसान करत राहिले तर आम्ही शांत बसणार नाहीत. आज आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन थांबत आहोत. मात्र येणाऱ्या काळात सरकारने निर्णय बदलला नाही, तर आमचे आंदोलन अजून तीव्र असेल, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली. दरम्यान ठाकरे सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी देण्यात आल्याने परिसर दणाणून गेला होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close