आपला जिल्हा

बीड करांनो काळजी घ्या, कोरोना रुग्णांची संख्या द्विशतका जवळ पोहोचली

बीड — राज्य रोज लॉक डाऊन च्या दिशेने वाटचाल करत असताना बीडमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्याची द्वि शतकाकडे पावलं पडत असल्याचं दिसत आहे. तब्बल 185 रुग्ण सापडल्याने येणाऱ्या काळात बीड कराना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे राज्य लाॅक डाऊन च्या दिशेने जात असल्याचं दिसत आहे. दररोज रुग्ण सापडण्याचा आलेख चढता आहे. बीड जिल्ह्यात देखील दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याचे वैद्यकीय अहवालावरून दिसत आहे. निर्बंध मोठ्या प्रमाणावर असले तरी जनतेच्या मनातील भीती नाहीशी झाल्यामुळे निष्काळजीपणात वाढ झाल्याने रुग्ण संख्या आटोक्यात येणे अवघड बनले आहे. 1407 जनांच्या अहवालात 185 रुग्ण नव्याने सापडले आहेत. यामध्ये बीड,अंबाजोगाई मध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले. अंबाजोगाई मध्ये 42, आष्टी तालुक्यात 16, बीड तालुक्यामध्ये 85 रुग्ण सापडले. धारूर तालुक्यामध्ये सर्वात कमी म्हणजे एक रुग्ण सापडला गेवराई मध्ये 12 केज मध्ये सात माजलगाव मध्ये 13 परळी मध्ये 5 शिरूर मध्ये एक वडवणी तीन रुग्ण सापडले. पाटोदा तालुका मात्र अपवाद ठरला गेला या ठिकाणी एकही रुग्ण सापडला नाही.
रुग्णांची वाढती संख्या बीड करांसाठी धोक्याची घंटा असून जनतेने कोरोना नियमांचे पालन करत काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close