क्राईम

जुन्या भांडणातून तरुणाचा खून ; घटनेने अंबाजोगाई शहर हादरले!

अंबाजोगाई — अंबाजोगाई शहरातील सावरकर चौक नजीक च्या प्रांगणात बुधवारी  रात्री साडे बाराच्या सुमारास एका तरुणाचा धारदार शस्त्राने प्रहार करत खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठ दहा दिवसांमध्ये घडलेल्या या दुसऱ्या खूनामुळे अंबाजोगाई शहर हादरले आहे.
नितीन उर्फ बबलू साठे या 38 वर्षीय खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सावरकर चौकाजवळील रॉयल बेकरी च्या जवळ असलेल्या प्रांगणात जुन्या भांडणातून या युवकाची काही जणांशी बाचाबाची झाली. याचे पर्यावसान मारामाऱ्या मध्ये झाले. यावेळी झालेल्या मारहाणीत नितीन च्या डोक्याला गंभीर इजा झाली परिणामी त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेमागच्या कारणांचा शोध घेत दोघा संशयितांना ताब्यात घेतले. तर, मुख्य संशयित फरार झाला असून त्याचा कसून तपास सुरू आहे. मागील महिन्यात नितीनचा या मुख्य संशयितासोबत वाद झाला होता,
याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी देखील अंबाजोगाई शहरामध्ये खुनाची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात खळबळ माजली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close