आपला जिल्हा

कोरोना योध्दा महिलांचा सन्मान; राकॉ महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांचा उपक्रम

बीड —  महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांच्या वतीने सोमवारी (दि.८) कोविड योध्दा महिलांचा सन्मान करण्यात आला. सफाई कामगार, डॉक्टर, परिचारिका तसेच महिला पोलिसांचा सत्कार करुन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

कोरोना महामारीमुळे वर्षभरापासून आरोग्य, स्वच्छता विभाग, पोलीस प्रशासनाचा कस लागलेला आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून विविध क्षेत्रांतील महिलांनी कोरोना काळात मोलाचे योगदान दिल.े त्यामुळे कित्येकांचे प्राण वाचले. महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांनी
कोविड योध्दा महिलांचा सन्मान केला. डॉ.सुनीता बारकुल, डॉ. दीपाली कट्टे, शिवाजीनगर ठाण्यातील उपनिरीक्षक मीना तुपे यांच्यासह महिला पोलीस तसेच पालिकेच्या सफाई कामगार महिला व परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या उपक्रमाने कोविड योध्दा महिला भारावून गेल्या होत्या. यावेळी डॉ.अनिल बारकुल, डॉ.अतुल बिर्ला, डॉ.विजय कट्टे, शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, राष्ट्रवादीच्या राणी शेख उपस्थित होत्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close