महाराष्ट्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा 14 मार्चला

  जिल्ह्यातील 3970 उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

 बीड —  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा (पूर्व) परीक्षा 2020 ही दिनांक 14 मार्च 2021 रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकुण (13) उपकेंद्रामधून दोन सत्रात घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी एकूण 3970 उमेदवार बसलेले असून परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परीसरात फौ.प्र.सं.1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. उमेदवारांनी त्यांचे कडील मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्क्ट्रीक वस्तु व अभ्यासाचे इतर साहीत्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही. आयोगाने दिलेल्या सुचनेप्रमाणे उमेदवारांना जेवनाचा डब्बा, अल्पोपहार व पाण्याची बॉटल आणण्यास परवानगी देण्यात येत आहे. दोन पेपरच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे.
कोव्हीड-19 विषाणूच्या प्रादूर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना,आदेशाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे आणि सर्व उमेदवारांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक आहे. स्वच्छता तसेच आरोग्यदायी स्थिती व्यवस्थेसंदर्भात शासनाकडून, संबंधित प्राधिकरणाकडून सूरक्षा व आरोग्याच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेला सल्ला सर्व ठिकाणी पाळणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवारांनी मास्क,हॅन्डग्लोज व सॅनिटायझर वापरणे परीक्षाकेंद्रावर बंधनकारक आहे.
परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हींग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही दोन ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांचे परीक्षा क्रमांक 01 व 02 साठी सकाळी 8.30 वाजेपूर्वी उपस्थित राहाणेबाबत याद्वारे सूचित करण्यात येत आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबी खाली प्रवेश दिला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असे निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close