देश विदेश

चक्क उंदरांनी ढोसली 29हजार लिटर दारू; गांजा आणि आफूची केली नशा

फरीदाबाद– पोलीस ठाण्याच्या गोदामामधून 29 हजार लिटर दारूच्या बाटल्या, कंटेनर सोबतच गांजा आणि आफू या मादक पदार्थांची पाकिटे देखील उंदरांनी गायब केली. आसा अजब दावा फरीदाबाद पोलिसांनी केला आहे.ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
पोलिसांनी जप्त केलेली दारू नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून डेटा गोळा केला जात होता. यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार ५३ हजार ४७३ लीटर देशी दारू, २९ हजार ९९५ इंग्लीश दारू, बीअरचे २ हजार २०८ कॅन, ८०५ लीटर कच्ची दारू जप्त केली होती. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ही दारू जप्त करण्यात आली होती.हि दारू गोडावूनमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र, ही दारू व गांजा उंदारांनी प्राशन केली, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
उंदरांनी ढोसली दारु
उंदरांनी देशी आणि कच्ची दारु असे सुमारे २०,००० लीटर मद्य वाया गेले आहे. उंदरांच्या कुरतडल्यामुळे दारु वाहून गेली आहे. त्याचवेळी इंग्लीश दारुच्या बाटल्यांचे झाकण तोडून उंदीरांनी जप्त केलेली सुमारे ९ हजार लीटर दारू गायब केली, असे काही पोलिसांचे म्हणणे आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close