क्राईम

चोरट्यांनी दुकान फोडून चार लाखाची पितळाची मोड पळवली

बीड — बार्शी रोड वरील राष्ट्रवादी भवन जवळ असलेल्या स्टील स्क्रॅप दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील पितळेची भांडी चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रहदारीच्या रस्त्यावर ही घटना घडल्यामुळे भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.
बार्शी रोड वरील राष्ट्रवादी भवन समोर साई स्टील स्क्रॅप नावाचे ज्ञानेश्वर रंगनाथ जवकर यांच्या मालकीचे दुकान आहे. सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे कुलूप तोडले. दुकानांमध्ये प्रवेश करून दुकानात 8 ते 9 पोत्यामध्ये असलेली पितळी भांड्याचीी चार ते साडेचार लाख रुपये किंमतीची मोोड चोरून नेली .एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोड चोरून नेण्यासाठी चार चाकी वाहनाचा वापर केला गेला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. मंगळवारी सकाळी जवकर आपल्या दुकानात आले असता चोरी झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती दिली ‌. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close