आपला जिल्हा

डीसीसी बँक निवडणूक; सेवा संस्थांच्या इच्छुक उमेदवारांना दिलासा नाहीच

बीड — लेखापरीक्षणाच्या निकषामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवा संस्था मतदारसंघातून 11 जागांसाठी चे अर्ज बाद झाले होते. परंतु तरीदेखील अनेकांनी लातूरच्या विभागीय सहनिबंधकाकडे धाव घेतली होती मात्र त्यांनीदेखील हे अर्ज फेटाळल्या मुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरु आहे. यात सेवा संस्था मतदारसंघातील ११ जागांसाठी तब्बल ७८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते , परंतु लेखा परीक्षणाच्या नियमांमुळे यातील एकही अर्ज पात्र ठरला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख यांनी या ११ जागांवरील सर्व अर्ज बाद केल्यानंतर यातील अनेकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला लातूरच्या विभागीय सह निबंधकांकडे आव्हान दिले होते. यावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र सह निबंधकांनी यावरच निर्णय राखून ठेवला होता. सोमवारी दुपारी हे सर्व आक्षेप फेटाळत असल्याचा निर्णय सह निबंधकांनी जाहीर केला. यामुळे भाजपच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.
————————————-
जन आंदोलनातर्फे अनेक ठिकाणी निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. बीड जिल्हा बँक शेतकऱ्यांचा कणा म्हणून पुन्हा उभी रहावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अपात्र लोकांना आणि ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा लोकांना बँकेच्या परिसरात फिरकू देणे सुद्धा योग्य नाही. त्यामुळे जन आंदोलनाला जिल्हा बँकेत संदर्भात वेळो वेळी काळजी घ्यावी लागते. जनतेच्या हितासाठी आम्ही जिल्हा बँकेच्या कारभाराकडे सातत्याने लक्ष ठेवू
अँड. अजित देशमुख

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close