क्राईम

लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला अन् स्वतः पोलीसात हजर झाला

माजलगाव — जागेचा किराया वरून दोन भावांमध्ये झालेल्या भांडणात लहान भावाने मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना पात्रूड येथे घडली.

पात्रुड येथे जागेच्या किराया घेण्यावरून व दोन भावामध्ये अनेक दिवसापासून वाद सुरु होता. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघामध्ये वाद निर्माण झाला. हे भांडण सुरू झाल्यानंतर दोन्ही भावांच्या हातामध्ये धारदार शस्त्र असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भांडणांमध्ये
शेख हर्षद शेख शकील या छोट्या भावाने शेख इर्शाद शेख शकील याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शेख इर्शाद चा मृत्यू झाला. खून झाल्यानंतर आरोपी हा स्वतः माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजार झाला आहे. या भांडणात आई एकाच्या बाजूने तर वडील एकाच्या बाजूने असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ग्रामीण पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली . घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील यांनी भेट दिली. या संदर्भात मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close