क्राईम

खून की आत्महत्या ? : सौताडा धबधबा येथे एकाचा मृतदेह सापडला

पाटोदा — सौताडा धबधब्या येथे एक मृतदेह सापडला असून हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे.दोन तीन दिवसापूर्वी धबधब्यावरून उडी मारलेली असावी असा प्राथमिक अंदाज असून पाटोदा पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तांदळे वर तांबे साहेब हे घटनास्थळी दाखल झाले असुन

मृताची ओळख पटलेली आहे. मृत असलेले इसम वय वर्ष 34 हे आष्टी तालुक्यातील आंधळे वस्ती केरुळ येथील असून ते सध्या एस टी महामंडळ मध्ये मुंबई येथे कार्यरत होते. नेमकी ही आत्महत्या आहे की हत्या?अशी चर्चा सर्वत्र चालू आहे
रामेश्वर हे पर्यटन स्थळ संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असून येथील निसर्गरम्य धबधबा श्री क्षेत्र रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रोज ये-जा करतात. आज दिनांक 8 मार्च  रोजी दुपार च्या सुमारास सौताडा येथील फोटो ग्राफर प्रशांत घुले वनखात्यातील वनरक्षक भाऊसाहेब पेचे नवनाथ उबाळे हे नेहमी प्रमाणे जंगलात गस्त घालत असताना त्यांना
धबधब्याजवळ दगडा मध्ये अज्ञात मृतदेह पाहण्यास मिळाला या वेळी पाटोदा पोलीस स्टेशन चे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल तांदळे व तांबे पुढील तपास करीत आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close