आपला जिल्हा

अॅन्टीजन टेस्ट केली तरच दुकान उघडता येणार

बीड — कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध घातले जात आहेत. आता व्यापाऱ्यांच्या अॅन्टी जण टेस्ट करण्यात येणार असून 15 मार्च पर्यंत जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना अॅन्टीजन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. टेस्ट न केल्यास दुकान उघडण्यास मनाई केली आहे ‌
यासंदर्भातील आदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सोमवारी दि.8 मार्च रोजी काढले आहेत.
व्यवसाय करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना आता अँटिजन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहेत. दि.15 मार्चपर्यंत सर्व दुकानदारांनी टेस्ट करून घ्यावी, जे दुकानदार टेस्ट न करता दुकान उघडतील अशा दुकानदारांवर थेट फोैजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जगताप यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close