महाराष्ट्र

औरंगाबाद: 11 मार्च ते 4 एप्रिल अंशतः लॉक डाऊन, शनिवारी रविवारी संपूर्ण लॉक डाऊन

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता 11 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अंशतः लाॅक डाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.यासंदर्भातील निर्णय संयुक्त पत्रकार परिषदेत आज संध्याकाळी जाहीर करण्यात आला. शनिवार आणि रविवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या उपस्थितीत ही संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.
या वेळी टास्क फोर्स ची बैठक घेण्यात आली. यात प्रामुख्याने रुग्णालयामधील सर्व सेवांचा आढावा घेण्यात आला.
15 फेब्रुवारीपासून रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांपासून हा आकडा चारशेपार गेला आहे. यामुळे प्रशासनाने उपाययोजनांची आखणी केली आहे. त्यानुसार येत्या 11 मार्चपासूनपासून अंशतः लॉकडाऊन करण्यात येणार आहे. हे अंशतः लॉकडाऊन 4 एप्रिलपर्यंत असेल. यादरम्यान निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा आणि रुग्णसंख्येचा आढावा घेऊन प्रशासन पुढील निर्णय घेणार आहे. या कालावधीमध्ये धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलने, मोर्चे यावर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, क्लासेसवर बंदी घालण्यात येणार आहे. ऑनलाईन शाळेला मात्र परवानगी असेल. याशिवाय नियोजित परीक्षा घेण्यात येणार आहेत.

मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल मधील लग्नास बंदी असेल. हॉटेल, बार, परमिट रूम रात्री 9 पर्यंतच 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहे. याशिवाय हॉटेल ऑनलाईन/पार्सल 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहील.
वैद्यकीय सेवा, दूध, भाजीपाला, गॅस, पेट्रोल पंप, उद्योग, मीडिया, बँक, पशुखाद्य नियमावलीनुसार सुरू राहील. सर्वांची दर 15 दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असेल. याशिवाय जाधववाडी बाजारपेठ 7 दिवस बंद करण्यात येणार आहे. कुरूना नियमांचे पालन करत खाजगी कार्यालय, सरकारी कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत.
नियम पाळले तर अंशत लॉकडाऊनमुळे विषाणूवर नियंत्रण मिळवता येईल नसता कडक लॉकडाऊनच्या दिशेने जावे लागेल. सर्व विभागांना सोबत घेऊन विषाणूला थोपवू. सर्वांनी लस घ्यावी, नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close