क्राईम

चौसाळा चेक पोस्टवर रिटायर झालेल्या होमगार्डची केंद्रेनी लुटमारीसाठी केली नियुक्ती

बीड — बीड उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवरील चेक पोस्टवर रिटायर झालेले होमगार्ड रात्री बारा वाजता ड्रेस वर जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आडवत त्यांची लूटमार करत आहेत. या सर्व प्रकाराला नेकनूर चे पी आय केंद्रे यांच समर्थन मिळत असून जवळपास रोज सरासरी तीस हजार रुपयांची कमाई यातून पोलिसांना होत असल्याचं बोलले जात आहे. ही लूटमार करण्याच्या मोबदल्यात शेख कोरडे जाधव या तीन होमगार्डना नाईट ड्युटी चे प्रत्येकी दोन हजार रुपये केंद्रे यांच्या मार्फत दिले जात असल्याचं बोलले जात आहे.

नेकनुरचे पीआय लक्ष्‍मण केंद्रे यांनी जनसेवेचा बुरखा पांघरलेला असला तरी त्या बुरख्याआडून कृष्ण कृत्यांना खतपाणी काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केल जात आहे. अवैध धंद्यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऊत आला असून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा दारूचे धंदे मटका जुगार राजरोस सुरू आहेत. यातून होणारी कमाई कमी पडली की काय म्हणून चौसाळा चेक पोस्ट ला लुटमारीच मुख्य केंद्र बनवल गेला आहे. या चेक पोस्टवर रिटायर झालेल्या तीन होमगार्ड ची नियुक्ती केंद्रे यांनी केली आहे. यामध्ये शेख ,कोरडे, जाधव यांचा समावेश आहे. हे तीन जण रात्री बारा वाजता चेक पोस्टवर जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करतात. यामधून मोठी रक्कम सकाळी चार वाजेपर्यंत या तिघांच्या हाती पडते. या तिघांवर लक्ष ठेवण्यासाठी चौसाळा चौकीतील पोलीस कर्मचारी जायभाये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच एखाद्या गाडीमध्ये चोरीचा माल अथवा गुटका दारु सापडलीच तर पोलिसांची तपासणी व मांडवली होईपर्यंत अर्धी गाडी रिकामी करण्यासाठी देखील खास माणसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मांडवली होईपर्यंत गुटका दारु सापडलेल्या गाडीतील अर्धा मालक दुसऱ्या गाडीत भरून तो माला नंतर काळ्याबाजारात विकल्या जातो या धंद्यामध्ये देखील पोलिसांना व या तीन होमगार्ड ना मोठी कमाई होत असल्याचं बोललं जातं. रात्री होत असलेल्या या लुटमारीच दुसऱ्या दिवशी चौसाळा मध्ये चवीने चर्चा केली जाते. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे दररोज पंचवीस ते तीस हजार रुपयांची कमाई या लुटमारी तून होते. ही मोहीम फत्ते करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तीन रिटायर होमगार्डस् ला रात्रपाळीच्या कामासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. जर गुटका दारु च्या गाडीतील माल लंपास करता आला तर त्यासाठी वेगळी रक्कम नेकनूर पोलिसांकडून दिली जाते.
या सर्व प्रकारांना पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी आळा घालतील काय? वाहनचालकांची होणारी लूट थांबणार काय ? असे एक ना अनेक प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close