आपला जिल्हा

आ. पवारांच्या आंदोलनाला यश, अपसेट किंमत २५ टक्क्याने कमी

            •  कमी दरात घरकुलांना मिळणार लवकरच वाळु

मुंबई — वाळुचे टेंडर काढताना अपसेट किंमत कमी करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले होते. आज या प्रकरणात महसुल मंत्र्यांसह सचिवांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अपसेट किंमत २५ टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेत अन्य मागण्यांवर धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन आ. पवारांना दिले.
आज सकाळी आ. लक्ष्मण पवार, आ. राजेश पवार यांनी वाळु प्रकरणावरून महसुल मंत्र्यांचं लक्ष केंद्रित केलं होतं. त्या अनुषंगाने महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, अप्पर सचिव नितीन करीर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत वाळुच्या प्रश्‍नावर आ. पवारांनी ज्या मागण्या लावून धरल्या होत्या त्यावर चर्चा झाली. वाळु टेंडर काढताना अपसेट किंमत जास्त असल्याने गेवराई तालुक्यातील १६ घाटांपैकी केवळ ४ घाटांचा लिलाव झाला. हे जेव्हा महसुल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले तेव्हा अपसेट किंमत २५ टक्क्याने कमी करण्याचे निर्देश महसुल मंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर अपसेट किंमतीबाबत राज्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगून घरकुलासाठी कमी दरात वाळू मिळविण्यासाठी लवकरच महत्वपुर्ण निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही महसूल मंत्र्यांनी या वेळी दिले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close