क्राईम

जीवे मारण्याची धमकी देत विधवेवर बलात्कार, आरोपी तात्काळ अटक

केज — एका २५ वर्षीय विधवा महिलेच्या घरात घुसून तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत नराधमाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगांव येथे घडली.पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या नारायण प्रल्हाद तांदळे या नराधमास अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कारेगाव येथे एक विधवा महिला आपल्या लहान मुलासह घरी असताना नारायण तांदळे या इसमाने घरात शिरून लहान मुलास जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी घडली होती. हा धक्का सहन न झाल्यामुळे या पीडित महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारानंतर या महिलेने याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गु. र. नं. १०३/२०२१ भा. दं. वि. ३७६ आणि ५०४ नुसार नारायण तांदळे यांच्या विरुद्ध बलात्कारासह पीडितेला जिवे मारण्याची धमकी देणे अशा प्रकारचा गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तात्काळ आरोपीस अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close