क्राईम

अखेर कोळगावचा विनयभंगाचा आरोप असलेल्या फरार मठाधिपतीचा जामीन अर्ज फेटाळला

गेवराई — कोळगाव येथील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्यावर ॲट्रॉसिटी व बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे .याप्रकरणी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे त्यामुळे पोलिसांना गुंगारा देत असलेला महाराजास अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोळगाव संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्या विरोधात बाललैंगिक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर महाराजांनी प्रकरणाला नाट्यमय कलाटणी देत आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वरून व्हायरल केला. त्यामुळे पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत होते. मात्र ते पंढरपूर येथे असल्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. फरार असलेल्या या मठाधिपतीने बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा दरवाजा अटकपूर्व जामीन मिळावी यासाठी ठोठावला होता. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर सुनावणी झाली, मात्र न्यायालयाने हनुमान महाराज गिरी यांना अटकपूर्व जमीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महाराजाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close