आपला जिल्हा

जिल्हा बँकेत संदर्भातील सर्व अपिले फेटाळून लावा – अँड. अजित देशमुख

बीड—  बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, बीड च्या उपविधी मधील तरतुदीप्रमाणे जिल्हा बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी नियमांचे पालन करून सत्त्यांशी अर्ज बाद केले आहेत. यातील जवळपास पन्नास लोकांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांच्याकडे अपीले दाखल केली आहेत. बँकेच्या नियमावली मधील तरतुदी प्रमाणे ही अपिले फेटाळून लावावीत, अशी मागणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली आहे.

विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांना याबाबत कळविताना देशमुख यांनी म्हटले की, जिल्हा बँकेच्या उपविधी मधील तरतुदी प्रमाणे ही अपिले फेटाळण्यात येणे आवश्यक आहे. बँकेच्या नियमातील नियम ३४ ला चंद्रकांत पाटील सहकार मंत्री असताना त्यांनी स्टे दिला होता. म्हणून या नियमाचे उल्लंघन होऊन बँकेचे बायलॉज बाजूला सारले गेले होते.

बँकेच्या उपविधी मधील तरतुदींचे पालन करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हाच निर्णय कायम राहणे अपेक्षित आहे. बेकायदेशीर रीतीने संचालकांच्या निवडी झाल्या अथवा त्यांना अशा प्रकारची सवलत मिळाली, तर ते योग्य होणार नाही.

संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेला पहिल्यांदाच अकरा जागांमधून एकही पात्र उमेदवार मिळाला नाही. ही दुर्दैवी बाब आहे. अ आणि ब दर्जाच्या लेखापरीक्षण अहवाल असलेल्या संस्थाच जिल्ह्यात नाहीत का ? असा प्रश्न या वेळी उपस्थित होत आहे. ज्यांना सहकारातील मातब्बर समजले जाते, अशा सर्वांच्याच मनसुभ्यांवर यामुळे पाणी फिरले आहे. ही बाब देखील गंभीर आहे.

त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये जवळपास पन्नास अपिले रद्द करण्यात यावी. ती फेटाळून लावून बँकेच्या उपविधीचे पालन व्हावे. असे देशमुख यांनी विभागीय सहनिबंधक यांना कळविले आहे. ही मागणी अत्यंत रास्त असून या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, असेही कळविण्यात आले आहे. दरम्यान  होणाऱ्या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close