आपला जिल्हामहाराष्ट्र

वाळू प्रश्नी गेवराई चे आमदार लक्ष्मण पवार यांचे विधान भवनाच्या पायर्‍यांवर उपोषण

गेवराई — गेवराई तालुक्यातील वाळू प्रश्नासंदर्भात तहसील कार्यालयासमोर उपोषण करून देखील अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. याचा निषेध करत आमदार लक्ष्मण पवार तसेच नायगाव चे राजेश पवार यांनी िधान भवनाच्या पायर्‍यांवर उपोषण करत सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
गेवराई जवळ असलेल्या गोदावरी, सिंदफणा पात्रातून होत असलेल्या वाळू उपशामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.वाळूचे टेंडर काढताना अपसेट किंमत कमी करा, जेणेकरून वाळू सामान्य माणसांना योग्य किमतीत मिळेल, वाळूची वाहतूक अवजड वाहनांच्या ऐवजी टॅक्टरच्या सहाय्याने करावी तसेच या व अन्य मागण्यांसाठी आमदार लक्ष्मण पवार यांनी १९ जानेवारी रोजी गेवराई तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते.
या मागणी संदर्भात २७ जानेवारी रोजी अप्पर मुख्य सचिव महसूल व वन विभाग यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वरिष्ठांशी चर्चा करून एका आठवड्यात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यामुळे मंगळवारी लक्ष्मण पवार यांनी विधानभवना समोर उपोषण केले.
गेवराई विधानसभा मतदार संघातील गोदावरी व सिंदफना नदी पात्रातून मागील दोन वर्षांपासून टेंडर न निघाल्यामुळे अवैधरित्या अवजड वाहनाने वाळू उपसा केला जातो. ज्यामुळे शासनाचा महसूल तर बुडतोच, भरधाव वेगाने वाळूची वाहतूक केल्यामुळे नागरिकांच्या जिवितास धोका आणि रस्त्यांची देखील दुरावस्था होते.
प्रशासनाने मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यामुळे अखेर अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी लक्ष्मण पवार यांनी विधान भवनासमोर उपोषण सुरू केले.त्यांच्या सोबत राजेश पवार यांनी सुरु केलेल्या उपोषणाला विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर आमदार नारायण.कुचे यांनीही पाठिंबा दिला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close