देश विदेश

दोन हजार वर्षापूर्वी ची गाडी(कार) इटलीत सापडली

रोम — इटलीच्या पुरातत्त्ववाद्यांनी जमिनीखाली गाडले गेलेले प्राचीन शहर पोम्पईच्या बाह्यवर्ती भागातील एका विलामधून सुमारे 1942 वर्षांपूर्वीची प्राचीन ‘रोमन सेरेमोनियल’ गाडीचा (कार) शोध लावला आहे. पुरातत्त्ववाद्यांच्या मते, या गाडीचा वापर उत्सव अथवा खास समारंभादरम्यान करण्यात येत असे. इटलीतील पोम्पई हे शहर इ.स. 79 मध्ये ज्वालामुखीच्या स्फोटामुळे लाव्हारसाखाली गाडले गेले होते.

प्राचीन गाडी सापडणे म्हणजे हा एक अद्भूत शोध असल्याचे इटलीच्या सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे. लोखंड, कास्य आणि टीनपासून तयार करण्यात आलेल्या या गाडीची चारही चाके अत्यंत सुरक्षित आहेत. प्राचीन शहर पोम्पईच्या संरक्षक भिंतीपासून उत्तर दिशेला सुमारे 700 मीटर अंतरावरील सिविता गिऊलियानामधील एका प्राचीन विलामध्ये ही गाडी सापडली आहे.
या भागात अशा प्रकारचे प्राचीन वाहन सापडणे ही पहिलीच घटना आहे.

प्राचीन पोम्पई शहराचे अभ्यासक आणि संचालक मास्सिमो ओस्ना यांनी सांगितले की, आजपर्यंत आम्हाला प्रवासी आणि साहित्य वाहून नेणारी वाहने आढळून आली होती. मात्र, यावेळी आम्हाला समारंभ अथवा उत्सवादरम्यान वापरण्यात येणारी गाडी मिळाली. दरम्यान, नेपल्सपासून 23 कि.मी. अंतरावर स्थित तत्कालीन पोम्पईमध्ये 13 हजार लोक राहत होते. इ. स. 79 मध्ये ज्वालामुखीमुळे हे शहर लाव्हाखाली गाडले गेले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close