आपला जिल्हा

जप्ती पारगाव मधील कापूस गोदामाला आग, 75 कोटींचे नुकसान

बीड — जप्ती पारगाव शिवारातील एका कापसाच्या गोदामाला भीषण आग लागल्या ची घटना मंगळवारी घडली. यामध्ये सुमारे 75 कोटी रुपयाच्या कापसाचे गट्टे जळून खाक झाले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट असून तीन जिल्ह्यातीलअग्निशमन दलाच्या जवानांनी बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी आहे की, बीड तालुक्यातील जप्ती पारगाव शिवारात एका गोदामामध्ये कापसाच्या गठानी ठेवण्यात आल्या होत्या. सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक या गोदामाला आग लागली. आगीची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर घटनास्थळी एकूण नऊ बंब दाखल झाले होते. घटनास्थळावर अग्निशमन विभागाचे जवान येईपर्यंत संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या गोदामात ठेवलेल्या कापसाच्या गठानींची किंमत शंभर कोटी पेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत असून ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नाही.

21 हजार पेक्षा जास्त कापसाच्या गठाणी-

बीड पासून जवळच असलेल्या जप्ती पारगाव परिसरात गोदाम आहे .या ठिकाणी शासनाने खरेदी केलेल्या तब्बल 21 हजार पेक्ष्या जास्त कापूस गठाणी आणि खाजगी व्यापाऱ्यांच्या सहा ते सात हजार कापूस गठाणी होत्या .ज्याची मार्केट किंमत 75 कोटींच्या आसपास आहे. अग्निशमन दलाने तब्बल 13 ते 14 तास अथक परिश्रम करत ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close