क्राईम

अंबाजोगाईत तरूणाचा भर रस्त्यावर खून

अंबाजोगाई —अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील पाण्याची टाकी येथे २० वर्षीय तरुणाच भर रस्त्यावर खुन झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास झाली. या घटनेने शहरात खळबळ उडाली.

गणेश सुंदरराव मोरे (वय २०, रा. मोरेवाडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार मोरेवाडी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ लोखंडी सावरगाव रोडवर गणेश मोरे याच्यावर काही व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने गणेशवर वार करण्यात आले. हल्ल्यात अत्यावस्थ झालेल्या गणेशला स्वाराती रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार, पीएसआय सूर्यवंशी, कांबळे, एएसआय बोडखे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनमुळे शहरात प्रचंड खळबळ आहे. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. मयत गणेश हा एका वॉटर प्लान्टवर कामाला होता असे समजते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close