राजकीय

…. अखेर वन मंत्री संजय राठोड यांनी दिला राजीनामा

मुंबई — पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वादात सापडलेले वन मंत्री संजय राठोड यांनी आज आखेर मंत्रिपदाचा राजीनामा पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मंजूर केला आहे.
आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला.मी राजीनामा देतो पण चौकशी पुर्ण होऊ द्यात. त्यात मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजूर करा.’ अशी विनंती देखील राठोड यांनी केली होती.अशीच भूमिका एकनाथ शिंदे यांनी देखील घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम होते, अखेर त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यावेळेस पासून राजकीय वादळ उठले होते याबरोबरच भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा संजय राठोड यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खुद्द राठोड यांनीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अखेर संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.

पोहरादेवी महंताचा विरोध

दरम्यान, वनमंत्री संजय राठोड राजीनामा दिला आहे. पण, पोहरादेवी मंदिराच्या महंत जितेंद्र महाराज यांनी विरोध केला आहे. तसंच, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महंत जितेंद्र महाराज यांनी ई-मेलद्वारे विनंती केली आहे. संजय राठोड यांच्याबद्दल ज्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहे, त्याबद्दल सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नये, अशी विनंती जितेंद्र महाराज यांनी केली होती. याबरोबरच जर संजय राठोड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला तर पोहरादेवी गडावरून राठोड यांना शिवसेनेच्या आमदारकीचा ही राजीनामा द्यायला लावू, असंही जितेंद्र महाराज यांनी म्हटलं आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close