क्राईम

डीवायएसपी राहुल आवारेंच्या दुकानासह इतर चार ठिकाणी किराणा दुकान फोडणारे दोन चोरटे पकडले

बीड — पाटोदा धारूर परळी नेकनुर मध्ये किराणा दुकान फोडून काजू बदाम तेलाचे डबे यासह अन्य सामानाची चोरी करणारे दोन जणांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. काल सायंकाळी बार्शी नाका येथून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरी गेलेल्या माला पैकी 2 लाख 25 हजार रुपयांचे सामान तसेच चोरीसाठी वापरलेली गाडी असा एकूण चार लाख 25 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या टोळीने डी वाय एस पी राहुल आवारे यांच्या पाटोदा येथील आर के मार्ट मधील चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली आहे.
किराणा दुकानांमध्ये चोरी होण्याच्या घटनांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती याप्रकरणी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने शनिवारी संध्याकाळी बार्शी नाका येथे समीर शेख शमशोद्दीन, अफजलखान उर्फ बब्बू कासिम खान रा. बिलाल नगर, इमामपूर रोड बीड या दोघांना ताब्यात घेतली सुरुवातीला त्यांनी काही सांगण्यास टाळाटाळ केली मात्र पोलिसांनी आपला हिसका दाखवताच 17 डिसेंबर 2020 रोजी नेकनूर येथील अजहर ट्रेडिंग, 3 जानेवारी 2021 रोजी पाटोदा येथील आर. के.मार्ट, 25 जानेवारी 2021 रोजी धारूर येथील तिरुपती ट्रेडिंग तसेच 30 जानेवारी 2021 रोजी परळी येथील जय प्रोहिजन फोडली असल्याची कबुली दिली. या दुकानांमधून सुकामेवा तेलाचे डबे याबरोबरच अन्य किराना सामान चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी आतापर्यंत चोरी झालेल्या मालातील दोन लाख 25 हजार रुपयांचा माल जप्त केला याबरोबरच या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली गाडी देखील पोलिसांनी जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत पीएसआय डूलक, शेख सलीम बालाजी दगडे, खेडकर शेख नसीर, शेख आलिम, सुरवसे व टीमने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर काळे करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close