महाराष्ट्र

थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित होणार

मराठवाडयात पाणीपुरवठयाची  551 कोटी रूपये थकबाकी

वीज बिल भरूण सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन  
औरंगाबाद — कोरोना विषाणूच्या कालखंडात महावितरणच्या कोरोना योध्दयांनी  जीव धोक्यात घालून  वीज ग्राहकांना अंखडित व सुरळित वीज पुरवठा केला.  वीज बिलाच्या थकबाकीसाठी कोणत्याही वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला नाही. मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड,उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात महानगरपालिका, नगर पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, सार्वजनिक पाणी पुरवठयाच्या 12,754 वीज जोडण्यांचे 550.58 कोटी रूपये थकबाकी आहे. वीज बिलाच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणचा आर्थिक गाडा चालविणे अशक्य आहे. या पाणी पुरवठा ग्राहकांचा थकबाकीसाठी कोणत्याही क्षणी वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यासाठी वीज बिल भरूण सहकार्य करण्याचे आवाहन  महावितरणने केले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रार्दूभाव रोखण्यासाठी मार्च 2020 रोजी देशात लॉकडावून घोषित करण्यात आला. या काळात महावितरण कोरोना योध्दयांनी जीवाची पर्वा न करता वीज ग्राहकांना  कुठलाही त्रास होवू नये, यासाठी अखंडित व नियमित वीज पुरवठा केला. शिवाय एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या दहा महिन्याच्या काळात  मा. उर्जामंत्री डॉ नितिन राउत यांच्या आदेशान्वये   वीज बिलासाठी कोणाचाही वीज पुरवठा थकीत वीजबिलापोटी खंडित केला नाही.  मराठवाडयातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील महानगरपालिका, नगर पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, सार्वजनिक पाणी पुरवठयाच्या 12,754 वीज जोडण्यांचे 550.58 कोटी रूपये थकबाकी आहे. वीज बिलाच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणचा आर्थिक गाडा चालविणे अशक्य आहे. महावितरणला वीज खरेदी, वीज वहन, वीज यंत्रसामुग्री खरेदी, उपकेंद्र निर्मिती, देखभाल व दुरूस्ती, व्यवस्थापन खर्च, बॅकांचे कर्ज व व्याजाची परतफेड दरमहा आदी खर्चाला सामोरे जावे लागते. यासाठी वीज बिलाच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणला पर्याय नाही. थकीत वीज बिलासाठी  वीज पुरवठा   खंडित करण्याचे निर्देश महावितरणच्या व्यवस्थापनाने क्षेत्रिय कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते यांना दिले आहेत. नगर सेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पदाधिकारी यांनी वीज बिल भरण्यासाठी सहकार्य  करण्याचे आवाहन  महावितरणने केले आहे.

     जिल्हानिहाय  ग्राहक आणि थकबाकीचा  तपशिल

मंडल           वीज जोडण्या          वीज  बिलाची थकबाकी  कोटी रूपयांमध्ये
औरंगाबाद      1362                 50.37
जालना        1075                    29.12
लातूर        3253                    178.07
बीड          1261                     41.15
उस्मानाबाद     1662                 72.34
नांदेड         2824                   136.07
परभणी        771                     25.33
हिंगोली        546                     18.13
प्रादेशिक      12754              550.58
एकूण

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close