आपला जिल्हा

माजलगाव : दीड कोटी अपहार प्रकरणातील फरार मुख्याधिकारी पोलिसांना शरण

माजलगाव — विविध विकास योजना न राबवता माजलगाव न.प.चे मुख्याधिकारी बी सी गावित आणि नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी एक कोटी 61 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चौदा महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारी असलेला आरोपी बी.सी. गावित शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी रोजी आष्टी पोलिसांना शरण आला
माजलगाव शहरातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी 2016 पूर्वी एक कोटी 61 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र याच दरम्यान न प.च्या निवडणुक सुरू झाली. निवडणुकीनंतर सहाल चाऊस हे माजलगावचे नगराध्यक्ष बनले. यावेळी बी सी गावीत हे मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहत होते. 2017 मध्ये मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व लेखापाल यांनी संगनमताने एक रुपयाचे काम न करता रस्त्यासाठी आलेला एक कोटी 61 लाख रुपयांचा निधी उचलला. या घटनेनंतर तब्बल दोन वर्षाचा कालावधी उलटून गेल्यावर डिसेंबर 2019 मध्ये मुख्याधिकारी म्हणून आलेले विवेक जॉन्सन यांच्या निदर्शनास हा झालेला आपहार आला. त्यांनी मुख्याधिकारी व दोन लेखापालांविरूध्द अपहाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर गावीत हे फरार झाले होते. मार्च 2020 मध्ये नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना देखील आरोपी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. त्यांना पंधरा दिवसापूर्वीच सर्वोच्च न्यायालयातुन जामीन मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आष्टी येथील पोलीस ठाण्यात मुख्याधिकारी गावित स्वतःहून हजर झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close