क्राईम

स्वातंत्र्यवीर सावरकरांची सोशल मिडियातून बदनामी ,गून्हा दाखल करण्याची मागणी

परळी वैजनाथ – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल आज ऐन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिवशी (दि.२६) अपमानास्पद फेसबुक वर पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील सावरकर प्रेमींनी रोष व्यक्त केला. या प्रकाराचा सर्वस्तरातून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य महापुरुषां बद्दल अपमानास्पद मते ,आक्षेपार्ह टिप्पणी करुन सामाजिक शांतता भंग करणाऱ्या नरेश हालगे या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांची भेट घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले.

परळी शहर पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन देऊन तातडीने गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. आपला रोष व्यक्त करत याप्रकरणी संबंधित इसमावर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत निवेदनात म्हटले आहे की,नरेश हालगे ही व्यक्ती वारंवार फेसबुक व समाज माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य हिंदुत्ववादी महापुरुषांच्या संदर्भात जाणीवपूर्वक अपमानास्पद व भावना दुखावण्याच्या उद्देशाने मजकूर, छायाचित्रे प्रसारित करणे. या इसमाविरुद्ध सामाजिक शांतता भंग करणे, महापुरुषांची बदनामी करणे,भावना दुखावणे आदींसाठी कारणीभूत धरुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई करू अशी ग्वाही अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी दिली आहे. यावेळी कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन व सोशल डिस्टंसिंग पाळत सावरकर प्रेमींनी निवेदन सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close