आरोग्य व शिक्षण

गेवराईच्या महानुभाव पंथ आश्रमात 29 कोरोना बाधित सापडले

गेवराई — तालुक्यातील जवळ असलेल्या येवले वस्तीवरील महानुभाव आश्रमामध्ये तब्बल 29 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली आहे.
कोरोना च्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे अॅन्टीजन टेस्ट केल्या जात आहेत. या अनुषंगाने कोल्हेर जवळ असलेल्या येवले वस्तीवर असलेल्या महानुभाव पंथीयांच्या आश्रमात 25 फेब्रुवारी रोजी धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अनेक साधकांनी हजेरी लावली होती. या आश्रमात कायमस्वरूपी राहणाऱ्या साधकांची संख्यादेखील मोठी असते. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आश्रमातील जवळपास साठ साधकांची एन्टीजेन टेस्ट करण्यात आली यामध्ये तब्बल 29 जणांना कोरोना ची लागण झाल्याचे उघडकीस आले. एकाच आश्रमात एवढ्या मोठ्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासन हादरले आहे. दरम्यान गेवराई तहसीलदार सचिन खाडे आणि तालुका अधिकारी यांनी आश्रमास भेट दिली असून गुरुवारी झालेल्या धार्मिक सोहळ्यात सहभागी झालेल्या लोकांनी कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. याबरोबरच प्रशासनाने बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close