आपला जिल्हा

शहराला विकासाकडे घेऊन जाणारा बीड नगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर

येणाऱ्या वर्षात बीड शहराचा कायापालट करण्याचा संकल्प-नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर

बीड — गेल्या पंचवीस वर्षापासून बीड शहरात कसलीही करवाढ न करता बीड नगर परिषदेच्या अथक परिश्रमातून शहर विकासाचा संकल्प पूर्णत्वास आपण नेत आहोत शासनाकडून विविध योजना मंजूर करून घेत सार्वजनिक बांधकाम पाणीपुरवठा विद्युत स्वच्छता नगररचना यासाठी पाठपुरावा करून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड शहरासाठी मोठा निधी उपलब्ध करून विविध विकास कामे पूर्ण केली या वर्षी विविध योजनांचे आराखडे तयार करून पुढील वर्षात बीड शहराचा कायापालट करण्याचा संकल्प आपण केला आहे बीड शहराला विकासाकडे नेणारा हा शिलकी अर्थसंकल्प असून

सन 2021 22 या आर्थिक वर्षामध्ये महसूली उत्पन्न घरपट्टी पाणीपट्टी बेटरमेंट चार्ज बांधकाम परवानगी गुंठेवारी चार्जेस शासनाकडून मिळणारे महसुली अनुदान या स्वरूपात 91 कोटी 44 लक्ष 35 हजार तर शासनाकडून मिळणारे भांडवली अनुदान 185 कोटी 76 लाख व अंदाजे शिल्लक दोन लक्ष असे एकूण 277 कोटी 22 लाख 35 हजार इतके उत्पन्न प्राप्त होणार आहे त्या नुसार 277 कोटी 16 लाख 12 हजार खर्च गृहीत धरता सहा लाख 23 हजार शिलकीचे अंदाजपत्रक सादर करत आहे


शहरातील नागरिकांना विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले आहे

आज दिनांक 26 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बीड नगरपालिकेचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सादर केला यावेळी बोलताना ते म्हणाले की बीड नगरपालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध योजनांच्या माध्यमातून आपण सर्वच विभागाला नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे उत्पन्नापेक्षा 11 कोटी 91 लाख अधिकचा खर्च करावा लागला हा खर्च इतर अनुदानातून भागवण्यात आला बीड शहरात अनेक योजना राबविल्या असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून योजनेसाठी निधी मंजूर करून घेतला बीड शहरात सर्वाधिक बचत गट असून महिला बचत गटांना शून्य टक्के व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले केवळ बीड नगरपालिकेच्या माध्यमातून महिला बचत गटासाठी स्वतंत्र मॉल आपण उपलब्ध करून देणार आहोत शहराची हद्दवाढ होऊ लागली आहे त्यामुळे बीड शहरात लोकसंख्येच्या आधारावर 140 अंगणवाड्यांची गरज असून यासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे सध्या बीडची लोकसंख्या 2011 नुसार 2 लाख 3 हजार 240 इतकी आहे त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक वार्डात 2 घंटा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे शहरात बायोगॅस प्रकल्प आगामी काळात उभारण्यात येणार आहे पर्यावरणाच्या दृष्टीने 20000 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे त्यानुसार प्रत्येक भागात वृक्षारोपण करण्यात आले आहे काळात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता कोविड योद्धा म्हणून काम केले आहे त्यांचाही आम्ही सन्मान केला आहे

अमृत योजनेसाठी शासनाकडून 114 कोटी मंजूर झाले आहेत येत्या दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे 180 किलोमीटर लांबीची पाइपलाइन झाली आहे शहरात अतिरिक्त पाणी व्हावा या उद्देशाने काम चालू आहे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून यामुळे नगरपालिकेचे वीस लाख रुपये वीजबिल वाचणार आहे बीड शहरात 165 कोटीची भुयारी गटार योजना काम चालू असून एकूण 143 किलोमीटर पैकी 55 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे यासाठी देखील सातत्याने पाठपुरावा चालू आहे जीवन प्राधिकरण कडे सुरू असलेले ही कामे तात्काळ व्हावी यासाठी आपण सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहोत दुसऱ्या टप्प्यासाठी निधी करता पाठपुरावा चालू असून बीड शहरात 13294 पथदिवे बसविण्यात आले आहेत या पथदिवे यामुळे नगरपालिकेचे 40 लाख रुपये वीज बिल बचत होत आहेत गेल्या वर्षी दहा कोटी चा निधी अण्णांच्या माध्यमातून उपलब्ध करून घेतला ती विविध कामे आता पूर्णत्वास जात आहेत शहरातील प्रत्येक भागात अंतर्गत रस्त्यांची नाल्यांची कामे पुढील वर्षात पूर्ण करण्यासाठी आपण स्वतंत्र निधीची मागणी केली असून तो उपलब्ध होताच ही कामे देखील आपण पूर्ण करणार आहोत अल्पसंख्यांक विकासासाठी 15 कोटीचा निधी उपलब्ध होत असून रस्ते विकास अनुदान योजनेअंतर्गत आणखी 15 कोटी ची मागणी करण्यात आली आहे सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत शहरात 16 रस्ते पूर्ण होत असून यासाठी 85 कोटी ची कामे चालू आहेत हे मुख्य रस्ते झाल्यामुळे शहरात लहान-मोठे व्यापार सुरू झाले आहेत जमिनीच्या किमती वाढल्या आहेत याठिकाणी मार्केट आता वाढू लागले आहे तरूणांच्या हाताला काम मिळाले आहे बेरोजगारी कमी झाली आहे नगरोत्थान चा दुसरा टप्पा 56 कोटी चा आहे तो निधी उपलब्ध झाल्यास शहरातील आणखी काही मोठी रस्ते पूर्ण होणार आहेत शहरात 12 रस्त्याचा प्रस्ताव आपण सादर केला असून ही कामे करण्यासाठी आपला पाठपुरावा चालू आहे शहरात सुसज्ज आणि सर्व सोयींनी युक्त असे निसर्गरम्य पंढरी गार्डन उभारण्यात येणार आहे यासाठी स्वतंत्र 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत बीड शहरात 6 प्रभाग आरक्षित आहेत याठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत दलित वस्तीतील कामे करण्यासाठी 10 कोटीचा निधी उपलब्ध असून तो इतरत्र जाऊ देणार नाही बीड शहरात एकूण 1349 घरकुलाची मंजुरी असून त्यापैकी 600 घरकुल पूर्ण झाले आहेत तर 429 घरकुलाची कामे चालू आहे उर्वरित घरकुले ही पूर्ण होतील शहरात नागरिकांसाठी अकरा ओपन जिम उभारण्यात आल्या असून विविध प्रभागांमध्ये आणखी दहा जिमची गरज आहे यासाठीदेखील नगरपालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे सकल मराठा समाजाने जागेची मागणी केली आहे यासाठी देखील आपण जागा उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर ज्या ठिकाणी इस्तेमा आयोजित करण्यात आला होता त्या आठ एकर जागेचा विकास करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे बीड शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही प्रयत्न केले जात आहेत बीड शहरात एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे सध्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून आणखी तीन प्राथमिक आरोग्य केंद्र अंतिम मंजुरीसाठी प्रस्तावित आहेत एकूणच बीड नगरपालिकेचा अर्थसंकल्प हा पुढील वर्षात बीड शहराचा कायापालट करणारा असून विकासासाठी सर्वच नगरसेवकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे विकास कामांमध्ये आपण कधीही भेदभाव केला नाही आणि करणारही नाही प्रत्येक नगरसेवकाला स्वतःच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे एक नगराध्यक्ष या नात्याने शहर विकासाची जबाबदारी माझ्यावर असली तरी प्रभागातील नगरसेवकाच्या मागणीनुसार ही कामे करण्यात येतील बीड शहरात जी कामे झाली आहेत ती स्थानिक नगरसेवकाने मागणी केलेल्या नुसार करण्यात आली आहेत प्रत्येक प्रभागात कोणती कामे आवश्यक आहेत यासाठी संबंधित नगरसेवकाचे मत विचारात घेतले जाईल असेही ते म्हणाले यावेळी मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे,सर्व विभागाचे सभापती नगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी नगरसेवक उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close