क्राईम

जामखेड पोलिसांनी अफूची पावणेदोन लाखाची झाडं केली जप्त

जामखेड — तालुक्यातील जातेगाव येथील काळे वस्तीवर एकाने अफुची झाडे शेतात लावली आसल्याची गुप्त माहिती जामखेड पोलीसांना मिळाली. या माहिती आधारे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड त्यांनी आपल्या पथकासह प्रत्यक्ष त्या ठिकाणी छापा टाकून शेतात लावलेली 1 लाख 70 हजारांची 56 किलो वजनाची झाडे जप्त केली.


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहीती मिळाली की जामखेड तालुक्यातील जातेगाव या ठिकाणी एका व्यक्तीने त्याच्या शेतात अफुची झाडे लावली आहेत. त्यामुळे दि 25 रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी स्वतः त्या ठिकाणी पो. हे कॉ संजय लाटे, संदिप आजबे, संग्राम जाधव, आबासाहेब अवारे, विजय कोळी, सचिन पिरगळ, संदिप राऊत, अविनाश ढेरे यांच्या पथकासह त्या ठिकाणी गेले व खात्री करुन घेतली व त्या ठिकाणी जाऊन पाहिले आसता आरोपी वासुदेव महादेव काळे रा. काळे वस्ती, जातेगाव याने त्याच्या मालकीच्या गट नंबर 1077 मधिल शेतात 56 किलो वजणाची हिरव्या रंगाची बोंडे व पाने असलेली 1 लाख 69 हजार 815 रुपये किमतीची अफुची झाडे लावली आसल्याचे आढळून आले. त्या नुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी या ठिकाणी छापा टाकून सर्व झाडे जप्त केली असुन आरोपीस अटक केली आहे.

जामखेड पोलीस स्टेशन चे पो.हे.कॉ संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी वासुदेव महादेव काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close