क्राईम

मांडवली साठी ‘भगीरथ’प्रयत्न करत ‘अ’विश्वासाची’ बियाणी’ पेरणाऱ्या पेठ बीड पोलीसांच्या छाप्याची चौकशी सुरू

बीड — छापा मारत ‘पाटील’ की दाखवायची ‘भगीरथ ‘प्रयत्न करणारा मध्यस्थ गाठायचा मांडवली करत ‘अ ‘विश्वासा’ च बियाणी पेरायची त्यातून आर्थिक नफ्याचं पीक घ्यायचं. झालं गेलं सोडून द्यायचं ही स्थिती आहे पेठ बीड पोलिस ठाण्याची पण काही दिवसापूर्वी वाटर प्लांट वर छापा मारला मात्र कुठलीच कारवाई केली गेली नाही. या प्लांट मुळेच पापाचा घडा भरला आणि या मॅनेज छाप्याची चौकशी आता उपविभागीय पोलिस अधिकारी करणार आहे. यामध्ये भगीरथ प्रयत्न करत अ’विश्वासाच बियांण पेरणारा देखील या फेऱ्यातून सुटणार नाही .यातून नक्कीच पापाचा घडा फुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गुटख्याच्या पकडलेल्या गाड्या असो की केलेली छापेमारी असो पेठ बीड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जवळपास त्यांची प्रत्येक कारवाई संशयाच्या भोवर्‍यात अडकत गेली. एखाद्या प्रकरणावर वाद निर्माण झाला आज तर फक्त कागदपत्रांची खानापूर्ती करायची आरोपी बरोबर मांडवली करायची आणि आरोपी मोकाट सोडून द्यायचा ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. आरोपींमध्ये व विश्वास पाटला मध्ये मांडवली साठी ‘भगीरथ ‘प्रयत्न करणारे दलाल पोलिसांच्या प्रतिमेच्या विरोधात अविश्वासाची ‘ बियाणी’ पेरायचं त्याची ‘मुळे ‘खोलवर रूजायच काम करत आहेत. विशेष म्हणजे हे ‘भगीरथ ‘प्रयत्न करणारे दलाल हे एका सुसंस्कृत राजकीय पक्षाचे शहर प्रमुख देखील आहेत.केवळ या कामासाठी त्यांनी राजकीय जवळीक जवळीक निर्माण केली आहे. एकंदरच पेठ बीड पोलिसांची कामकाजाची पद्धत अशी आहे. काही दिवसापूर्वी एका वॉटर प्लांट वर पोलिसांनी छापा मारला या छाप्या मध्ये काहीच सापडले नाही असे सांगितले गेले पण माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. वरिष्ठांना मनाची नाही पण जनाची लाज वाटली . या प्रकरणाची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. या चौकशीमध्ये मांडवली साठी भगीरथ प्रयत्न करणारे चौकशीच्या रडार वर राहणार आहेत. शेवटी चौकशी करणारे अधिकारीही वॉटर प्लांट पाणी काही प्रमाणात पिऊन चौकशीच्या ‘ वाळूत मूतले फेस ना पाणी ‘अशी स्थिती होऊ देणार नाहीत ना म्हणून जनता शंकेने पहात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close