क्राईम

एस पी साहेब…नाकावर टिच्चून राजरोज वाळू उपसा सुरू आहे; तुमच्या पथकाला वाळू चोर सापडतात भुतेकरांना का नाही ?

तरीही आपण भूतेकरांवर कारवाई का करत नाही ?

बीड —  पोलीसांच्या मदतीने सुरु असलेला अवैध वाळू उपसा बंद होण्याच नाव घेत नाही. पोलीस अधीक्षकांच्या पथकांस वाळु उपसा करणारे सापडतात पण भुतेकरांना सापडत नाहीत याच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सिंदफना नदीपात्रातुन अवैध वाळू उपसा करून त्याची विनापरवाना वाहतूक करत असतांना चार ट्रॅक्टर , एका जेसीबीसह ३ ब्रास वाळू असा एकुण ५६ लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . ही कारवाई पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख एपीआय विलास हजारे यांनी आडगांव येथील सिंदफना नदीपात्रात गुरुवारी भल्या पहाटे केली .—————————————————-पिंपळनेर पोलीस गेल्या अनेक महिन्यांपासून राजरोज वाळू माफियांना अभयदान देत असल्याचे आजच्या कारवाईवरून सुद्धा निष्पन्न झाले. माध्यमांनी देखील ही बाब निदर्शनास आणून दिली. तरीदेखील पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी या गोष्टीकडे दुर्लक्ष का करत आहेत असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. वाळू उपशाची गंगाजळी थेट त्यांच्या कार्यालयापर्यंत येते की काय असं देखील जनतेतून बोललं जात आहे.

—————————————————–

पिंपळनेरपासुन जवळच असलेल्या आडगांव येथील सिंदफना नदीपात्रात आज पहाटे एपीआय विलास हजारे यांनी सहकाऱ्यांसह कारवाई करून १ जेसीबी , ४ ट्रॅक्टर आणि ३ ब्रास वाळू असा एकुण ५६ लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला . याप्रकरणी पो.शि.बापू राऊत यांच्या फिर्यादीवरून सिंदफना नदीपात्रातुन जेसीबी व ट्रॅक्टर मालकाच्या सांगण्यावरून अवैधरित्या विना परवाना बेकायदेशीररित्या वाळू उपसा आणि वाहतुक केल्याप्रकरणी प्रभाकर परमेश्वर देवडकर ( वय २८ रा.आडगांव ) , बाळू श्रीधर बनगर ( ३२ , रा.आडगांव ) , अंगद लक्ष्मण परिनकर ( रा.आडगांव ) आणि अशोक आबुज ( रा.रंजेगाव ) यांच्याविरूद्ध कलम ३७ ९ , १० ९ , ३४ भादवि सह कलम २१ ( १ ) ( २ ) सह कलम गौण खनिज कायदा सह कलम -१३० ( ३ ) / १७७ मोटार वाहन कायदाप्रमाणे पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . याप्रकरणातील अगंद परिनकर व अशोक आबुज हे फरार असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close