आपला जिल्हा

गॅस च्या स्फोटात तीन घरे जळून खाक

माजलगाव — तालुक्यातील मोगरा येथील शिवाजीनगर तांडा येथे झालेल्या गॅसच्या स्फोटात तीन घरे जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास सुमारास घडली.


मोगरा जवळच असणाऱ्या शिवाजी नगरतांडा येथे घरगुती गॅसला अचानक आग लागली.यामुळे लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. प्रकाश पवार, अशोक पवार, विकास पवार या तिन्ही भावांचे या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही.
माजलगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.तर तहसील कार्यालयाकडून घराचे पंचनामे करण्यात आले . दरम्यान या आगीत घरे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close