आपला जिल्हा

दलित वस्ती सुधारची कामे बांधकाम विभागाकडे देण्याचा घाट

पालिका हद्दीतील कामे वर्ग करून हात मारण्याचा प्रयत्न

बीड — लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना जिल्हास्तरीय समितीने निर्देशित केलेल्या कार्यान्वयन यंत्रणा रद्दबातल करून पहिलीच यंत्रणा पूर्ववत ठेवण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२०-२१ अंतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक दि.०८/१२/२०२० नुसार जिल्ह्यातील नगर परिषद/नगर पंचायत यांना अनु.जाती लोकसंख्येनिहाय निधी मंजूर करण्यात आला होता. सदरचा निधी नियमाप्रमाणे नगर परिषद अतिशय पारदर्शकपणे संबंधीत विकास कामांवरच खर्च करते. मागासवर्गीय वस्त्यांतून येथील नागरिकांनी व सन्मानिय सदस्यांनी आवश्यकतेनुसार नगर परिषदेकडे रस्ते,नाल्या व इतर प्रयोजनासाठी मागणी केल्यानंतर चा निधी मागणी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येतो.ही शासकीय बाब असून यात कुठे ही कुचराई किंवा दिरंगाई केली जात नाही.

आद्यपर्यंत तरी जिल्ह्यातील कुठल्याही नगर परिषद/नगर पंचायत यांनी निधीचा दुरुपयोग केला नाही.अतिशय सक्षमपणे नगर परिषदेने आजपर्यंत या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत.किंबहुना कार्य करणारी यंत्रणा नगर परिषदेकडे उपलब्ध आहे. परंतु बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व स्थानिक आमदार आपल्या पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून बीड जिल्ह्यातील केवळ तीन नगर परिषदेला वेठीस धरून बीड, धारूर, गेवराई नगर परिषदेला लक्ष करत राजकीय द्वेषातून सदरील योजनेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागास कार्यान्वयन यंत्रणा म्हणून निर्देशित करत आहे, हे उचित नसून मागासवर्गीयांच्यावर व अनुसूचित जाती चे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर अन्याय करणारे असून सदरचे आदेश रद्द करून कार्यान्वयन यंत्रणा पूर्ववत करून न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे.यावेळी नगरसेवक विष्णु वाघमारे, भीमराव वाघचौरे, पूजा गणेश वाघमारे, विकास जोगदंड, सखुबाई चांदणे, सीता भैय्यासाहेब मोरे उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्र्यांकडूनच मागासवर्गीयावर अन्याय

मागासवर्गीयांच्या हिताच्या आड कायम येणारे ना.धनंजय मुंडे हे मागासवर्गीयांच्या विकासासाठी असणाऱ्या पुर्ण योजना गुंडाळून समाज बांधवांना आर्थिक दृष्ट्या कमकुवत करण्याचे काम करत आहेत. नेहमीच समाज विरोधी भूमिका घेणारे सामाजिक न्याय नव्हे, अन्याय मंत्री ना.धनंजय मुंडे आता लोकशाहीर आण्णा भाऊ साठे वस्ती सुधार योजनेचा निधी वळवुन अनु.जातीवर अन्याय करून मागासवर्गीयांच्या वस्त्या भकास करू पाहत आहेत. परंतु हा त्यांचा डाव आम्ही उधळून लावू त्यांच्या विरोधात जिल्ह्यासह महाराष्ट्र भर आंदोलन करू.असा इशारा ऍड. विकास जोगदंड
संस्थापक/अध्यक्ष भिम स्वराज्य सेना बीड तथा नगरसेवक न.प. बीड यांनी दिला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close