ब्रेकिंग

कार अपघातात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बहीण व भाऊजींचा मृत्यू

गेवराई — कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर असलेल्या मातोरी जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती एका नाल्यात जाऊन कोसळली या दुर्घटनेत पती-पत्नींचा मृत्यू झाला. अपघात ग्रस्त दाम्पत्य हे भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बहिण व भाऊजी आहेत.


माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण ममता तगडपल्लेवार व भाऊजी विलास तगडपल्लेवार हे पुसद हून पुण्याकडे आपल्या मुलीला भेटण्यासाठी स्विफ्ट डिझायर क्र.एमएच-29 आर-4230 ने जात होते. कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर मोतोरी परिसरामध्ये कारवरील ताबा सुटल्याने कार नाल्यात जाऊन कोसळली. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यामध्ये विलास तगडपल्लेवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर ममता तगडपल्लेवार यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. घटनास्थळी चकलांबा पोलीस ठाण्याचे फौजदार डिगांबर पवार यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close