आपला जिल्हा

दहावी बारावी वर्ग वगळता शाळा कॉलेज 10मार्च पर्यंत बंद

बीड — राज्यात कोरूना रुग्ण संख्या वाढत असताना जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून दहावी आणि बारावी वगळता पाचवी ते नववी पर्यंत चे वर्ग दहा मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. यामध्ये अकरावी वर्गाचा सुद्धा समावेश आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला आहे .
कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांचे सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व इयत्ता आकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात 10 मार्च पर्यंत बंद करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते नववी, इयत्ता आकरावीचे वर्ग 10 मार्चपर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेश पारीत केले आहेत. दरम्यान बंद कालावधीत सदर विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज सुरू ठेवतील, असेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे. त्यांच्या या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड सहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण तरतूदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close