आरोग्य व शिक्षण

परळी तालुक्यातील रामेवाडी  येथील 500 कोंबड्या ‘बर्ड फ्ल्यू’ मुळे केल्या नष्ट केल्या

परळी — अखेर परळी तालुक्यामध्ये बर्ड फ्ल्यू ने शिरकाव केला. रामेवाडी येथीलकुकुट पालक तुकाराम कुकडे यांच्या पाचशे कोंबड्या आज नष्ट करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी भोवतालची तीन गाव संक्रमित क्षेत्र म्हणून तर तेरा गाव सतर्क क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात बर फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत होत्या. मात्र परळी तालुका अद्याप या रोगापासून दूर होता. परंतु रामेवाडी येथील तुकाराम कुकडे यांच्या काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने याची दखल घेतली. तपासणी अहवाल आल्यानंतर कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज तात्काळ कारवाई करत 500 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या.
त्यानंतर जिल्हाधिकारीआर.एस.जगताप यांनी रामेवाडीपासून एक किलोमीटर परिसरातील रामेवाडी तांडा, जळगव्हाण शिवारात प्राण्यातील संक्रमक व नैसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अंतर्गत संक्रमित क्षेत्र घोषित केले. तर पोहनेर, डिग्रस, रामनगर तांडा, हिवरा, गोवर्धन, हिवरा वस्ती, पिंपरी, तेलसमुख, बोरखेड, ममदापुर, कौडगाव हुडा, कौडगाव हुडा तांडा व माजलगाव तालुक्यातील कोथाळा आदी गावांना सतर्क क्षेत्र घोषित करत या गावातील कुकुट पक्षांची खरेदी-विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा, प्रदर्शनास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे कुक्कुटपालनाचा व्यवसाय धोक्यात आला आहे‌.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close