आपला जिल्हा

म्हणे .‌….! पालक मंत्री मूंडे म्हणाले तक्रारी होतच असतात….

बीड — येथील बीड जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देत असताना सोशल डिस्टन्स चा फज्जा उडवला अशा आशयाच्या बातम्या माध्यमांनी सोमवारी प्रकाशित केल्या. या बातम्या नंतर जिल्हा रुग्णालय प्रशासन माध्यमांनी दाखवून दिलेल्या समस्येवर तोडगा काढेल,अशी अपेक्षा होती. मात्र बीड चे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मी आत्ताच भेटून आलो आहे…. ते म्हणाले तक्रारी होतच असतात… त्याचे काय असते…. असे गावभर सांगत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गीते नी या प्रकरणातील गंभीरताच नष्ट केली. यातून मी काहीही केलं तरी पालकमंत्री माझ्या पाठीशी आहेत असा संदेश जणू त्यांनी माध्यमांना दिला.आशा अनागोंदी कारभाराचा फटका धनंजय मुंडे यांना बसल्याशिवाय राहणार नाही अशा भावना व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत.

त्याचे झाले असे की,सोमवारी बीड जिल्हा रुग्णालयात लसीकरण घेण्यासाठी आलेल्या शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या नियोजनाअभावी प्रचंड गर्दी केली. सोशल डिस्टन्सचा पूर्णतः फज्जा उडवला गेला. जिल्हा रुग्णालयाला अक्षरशः बाजाराचे स्वरूप आले होते. एकीकडे उद्धव ठाकरे व दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे जनतेला covid-19 नियमांचे पालन करा असे सांगत असताना हा प्रकार घडत होता. याचं कुठलेही सोयरसुतक जिल्हा शल्यचिकित्सक आना वाटलं नाही.
याबाबत माध्यमांनी वृत्त प्रकाशित केले. या वृत्तानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासन गांभीर्याने दखल घेऊन सोशल डिस्टन्स पाळण्यासंदर्भात योग्य त्या हालचाली करेल. अशी अपेक्षा होती व आहे. मात्र यामध्ये उलटेच झाले. बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते यांनी माध्यमांच्या या जनहिताच्या वृत्ताला वैयक्तिक घेतल्याचा प्रत्यय अनेकांना आला. बातम्या छापून आल्यानंतर पालकमंत्री यांना मी भेटलो व ते म्हणाले की, तक्रारी होतच असतात ….. त्याचं काय असतं….असं म्हणत त्यांनी माझी पाठराखण केली… असे सगळ्यांना सांगत सुटले आहेत… परिणामी माध्यमा माझ काहीच बिघडवू शकत नाहीत माझ्या पाठीशी पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न डॉ. गीते नी केला. अगोदरच धनंजय मुंडे यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे एक संकट संपत नाही तोपर्यंत दुसरे संकट त्यांच्यापुढे दत्त म्हणून उभा राहत आहे. अशा स्थितीत धनंजय मुंडे हे डॉक्टर गिते यांच्या बेदरकार वृत्तीमुळे पुन्हा अडचणीत येतील काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close