ब्रेकिंग

विनयभंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोशल मीडियातून आत्महत्येचा व्हिडिओ करणारा कोळगावचा महाराज प्रगटला

गेवराई – विनयभंग ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत गायब झालेला कोळगावचा मठाधिपती हनुमान महाराज गिरी तब्बल दोन आठवड्यानंतर परतला आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी बीड च्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
गेवराई तालुक्यात असलेल्या कोळगाव येथील सूर्य मंदिर देवस्थानचा मठाधिपती हनुमान महाराज गिरी याच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराजाने आपला रंग दाखवत हा गुन्हा केवळ ब्लॅकमेलिंग साठी असल्याचं सांगत माझ्याकडे पैशाची मागणी काही जणांनी केली त्यांची नावं देखील त्याने घेतली. या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ तयार करत सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर हनुमान महाराज गेल्या पंधरा दिवसापासून गायब होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन त्याचा शोध घेण्यात परेशान झाले होते. अखेर पोलिसांना महाराज पंढरपूरला असल्याची माहिती मिळाली व त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. गेल्या पंधरा वीस दिवसापासून पोलिसांना गुंगारा देणारा हनुमान महाराज याने अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.न्या.के.आर.पाटील यांच्यासमोर हनुमान महाराज गिरी यांचे अटकपूर्व जामिनाचे प्रकरण चालणार असल्याची माहिती मिळाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close