आपला जिल्हा

दुवा आणि दवा दोन्हीही महत्त्वाचे:लोटस परिवाराची उत्तम कामगिरी-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड — दुवा आणि दवा या दोन्ही ही गरज असते डॉक्टर खुदा तो नही पण माणसाला जीवदान देणारा देवताच आहे कोरोना काळात अनेक रुग्णांना धीर देऊन दर्जेदार व जिव्हाळ्याची सेवा देऊन लोटस परिवाराने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे

लोटस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त न्यूरो सर्जरी विभाग व बालरोग विभागाचा शुभारंभ तसेच लोटस पॅरामेडिकल कॉलेज चे उद्घाटन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ह-भ-प महादेव महाराज चाकरवाडी कर ह-भ-प चोले महाराज खडकी देवळा ह भ प गोविंद महाराज हातोला ह-भ-प श्रीमंत महाराज तांदळे माजीमंत्री बदामराव पंडित,नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बालरोग विभाग न्यूरो सर्जरी विभाग तसेच पॅरामेडिकल कॉलेजचा उद्घाटन समारंभ फित कापून करण्यात आला कोरोनाचे नियम पाळून अत्यंत कमी उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात ह भ प महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी शुभाशीर्वाद देऊन लोटस परिवाराला आशीर्वाद दिले तसेच नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनीही उत्तम आरोग्य सेवा बीडमध्ये सुरू करून लोटसमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टरांचे कौतुक केले,

यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेक रुग्णांना उपचारासाठी बाहेर जिल्ह्यात जावे लागत होते मात्र लोटस परिवाराने ही जबाबदारी घेऊन अनेक रुग्णांना धीर देऊन दर्जेदार व जिव्हाळ्याची सेवा दिली या ठिकाणी असणाऱ्या तज्ञ डॉक्टरांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांना जीवदान दिले आहे दुवा आणि दवा या दोन्हींची गरज असते डॉक्टर खुदा तो नही पण माणसाला जीवदान देणारा देवताच असतो या काळात अनेक रुग्णांना दर्जेदार सेवा महत्त्वाची ठरली या ठिकाणी असणाऱ्या सर्व तज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन बीडकरांसाठी ही महत्त्वाची सेवा सुरू केली आहे सर्व सेवा सुविधा उपलब्ध असणे हे गरजेचे असते कोरोना महामारी मुळे बळींची संख्या मोठी होत आहे निसर्गाने मानवासमोर हे एक मोठे आव्हान उभे केले आहे आरोग्य आणि शिक्षणावर आता मोठा खर्च अपेक्षित आहे सर्वसामान्य माणसाला आरोग्यावर खर्च करणे अवघड होत आहे माणसाच्या मनावर देखील मोठे परिणाम झाले आहेत कोरोनाने अनेक गोष्टी शिकवल्या प्रत्येक ठिकाणी आता माणूस विचार करू लागला आहे प्रथा-परंपरा माणुसकी जवळीक अनेक गोष्टी या काळात शिकायला मिळाल्या वैद्यकीय सेवा देत असताना विद्यार्थ्यांना टेक्निकल बाबी शिकता याव्यात यासाठी याठिकाणी डिप्लोमा कोर्स चालू करून विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत डॉक्टरांच्या मूल्य सेवा अमूल्य आहेत, स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सेवादर माफक ठेवल्या तर सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल लोटस परिवाराने माफक दरामध्ये या सेवा उपलब्ध करून द्यावेत असे ते म्हणाले यावेळी लोटस चे संचालक डॉ अमित काळे डॉ विशाल पिंगळकर डॉ अविनाश देशपांडे,डॉ श्रीनिवास शेळके डॉ आशिष गर्जे, डॉ सय्यद हसीब डॉ सुरज बांगर प्रा जगदीश काळे भास्करराव गर्जे भगवानराव शेळके यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष गरजे यांनी तर आभार प्रदर्शन आशिष काळे यांनी केले यावेळी अरुण डाके,विलास बडगे,दिनकर कदम,सखाराम मस्के,नगरसेवक राजेंद्र काळे,प्रभाकर पोकळे,विजय पालशिंगनकर,आदि उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close