आपला जिल्हा

उसाच्या उभ्या ट्रॉलीला मोटारसायकलची धडक, दोन ठार एक जखमी

माजलगाव — रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची जोरातमृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची घटना माजलगाव गेवराई रोड वर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
रविराज शेंडगे , विवेक मायकर तसेच अन्य एक जण माजलगाव गेवराई रस्त्यावरून मोटार सायकल ने केसापुरी कॅम्प कडे जात होते. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या उसाच्या ट्रॅलीला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की मोटार सायकलचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत
रविराज रामहरी शेंडगे (वय २०) रा.उमरी तर विवेक भागवत मायकर (वय२१) पिंपळगाव (नाकले) या दोन तरुणांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर तिसरा ओंकार काळे हा तरुण गंभीर जखमी असुन त्यास औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close