आपला जिल्हा

बीड तालुक्यात 605 घरकुल मंजूर तर 173 अर्ज अपात्र

        • कोणालाही लाच देऊ नका– अँड. अजित देशमुख

बीड — बीड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन दोन २०२०/२१ या वर्षामध्ये सहाशे पाच घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर वेगवेगळ्या कारणांनी सध्या अपात्र ठरलेल्या अर्जदारांच्या अर्जाची संख्या एकशे त्र्याहत्तर एवढी आहे. घरकुलाची ही योजना शासनाची योजना आहे. यासाठी कुठल्याही प्रकारची लाच देण्याची गरज नाही. त्यामुळे पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी कोणालाही लाच देऊ नये, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२०/२१ या कालावधीसाठी ही घरकुले मंजूर झाली आहेत. ज्या लोकांना ही घरकुले मंजूर झालेली आहेत, त्यांनी आपले काम पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

मंजूर घरकुल पैकी काळेगाव – ४३, ढेकनमोहा – ४२, कुकडगाव – ३९, बेलूरा – २४,तांदळवाडी घाट – १९, पालसिंगण – १९, साखरे बोरगाव – १८, उंबरद जहांगीर – १८, महिंद्रा – २०, करचुंडी – १६, याप्रमाणे या नऊ गावात २४० इतकी घरकुल मंजूर झालेले आहेत. या गावांना जास्त प्रमाणात लाभ मिळालेला आहे.

त्याखालोखाल अंथरवण पिंपरी – १४, करझनी – १०,खंडाळा – ८, कोळवडी – ८, लोणी शहाजनपुर – ११, मांजरसुंबा – १०, केसापुरी (परभणी) – १३, पाटोदा (बेलखंडी) ८, राजुरी – १२, पिंपळनेर – १२, पेडगाव – १२, उंबरज (खालसा) १०, याप्रमाणे घरकुल मंजूर झालेले आहेत.

गावात केवळ एक घरकुल मंजूर झालेल्या गावांमध्ये आहे, त्यामध्ये, आहेर वडगाव, अंबिल वडगाव, बहादरपूर, बोरखेड, पिंपरी, कामखेडा, खडकी घाट, कुटेवाडी, नेकनु पिंपरगव्हाण, या गावांचा समावेश आहे.

तर गावात केवळ दोन घरकुल मंजूर झालेल्या गावांमध्ये अंजनवती, बेलगाव, जिरेवाडी, काटवटवाडी, लिंबागणेश, लिंबारुइ देवी, माळापुरी, मांडवजाळी, मोरगाव, नामलगाव, नाथापूर, पाली, पिंपळगाव (मोची), रुई लिंबा, सोनपेठवाडी, वडगाव (गुंदा) या गावांचा समावेश आहे.

तीन घरकुल मंजूर झालेल्या गावांमध्ये गवळवाडी, नागझरी, नागापूर (बुद्रुक), पिंपळादेवी, रुद्रापूर, सफेपुर या गावांचा समावेश आहे. तसेच चार घरकुल मंजूर झालेल्या गावांमध्ये अवलपुर, सोनगाव, चिंचोली माळी, देवी बाभूळगाव, डोईफोडवाडी, सावरगाव या गावांचा समावेश आहे.

तर अन्य गावांमध्ये भाळवणी – ५, चराटा – ७, घोसापुरी – ६, हिवरा पहाडी साथ – ७, खापर पांगरी – ६, लिंबरुई – ५, मजरा पिंपळगाव – ५, मानकुरवाडी – ६, मंझरी हवेली – ५, मौजवाडी – ५, सोनेगाव – ५, तळेगाव – ६, वडगाव – ५, तांदळवाडी भिल्ल १०, पिंपळवाडी – ५, वरवटी – ७, अशा गावांचा समावेश आहे.

लाभार्थ्यांनी याची दखल घ्यावी, मंजूर असलेल्या घरकुल साठी लाच देण्याच्या उद्देशाने कोणताही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. जनतेने याची नोंद घ्यावी, असे आवाहन देखील अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close